पुण्यातील एका नुकत्याच घडलेल्या घटनेने समाजात न्यायप्रणालीच्या कार्यक्षमतेविषयी गंभीर प्रश्न उभे केले आहेत. एका १६ वर्षीय मुलाने दारूच्या नशेत गाडी चालवत असताना दोन लोकांचा बळी घेतला. या प्रकरणामुळे अल्पवयीन गुन्हेगारांवरील कायद्यांच्या प्रभावीपणावर पुन्हा विचार करणे गरजेचे आहे. अल्पवयीन आरोपींवर बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा, २०१५ लागू होतो. या कायद्याचा मुख्य उद्देश विधी-संघर्षित मुलांचे पुनर्वसन आणि सामाजिक पुनर्रचना आहे. १८ वर्षांखालील मुलांना जुव्हेनाईल - बालक समजले जाते आणि त्यांच्या गुन्ह्यांवर विशेष लक्ष दिले जाते. परंतु, निर्भया प्रकरणानंतर गंभीर गुन्ह्यांसाठी सज्ञान व्यक्तीप्रमाणेच अल्पवयीनांवरही कारवाई होऊ शकते, अशी सुधारणा करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी निष्काळजीपणाने मृत्यू (कलम ३०४(अ)) लावले होते, ज्यामुळे आरोपीला जामीन मिळाला. पण आता सदोष मनुष्यवधाचे (कलम ३०४-भाग २) आरोप लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही प्रक्रिया प्रथम बाल न्याय मंडळ कडून तपासून मगच पुढे जाईल. कायद्यानुसार, अल्पवयीन आरोपीचे नाव, पत्ता आणि शाळेचे नाव गोपनीय ठेवणे आवश्यक आहे. जर ह...
Contact for Consultation - 845493 4770