एक पोलीस अधिकारी पोलीस दलात सामील होत असताना तो/ती शपथ घेतो/घेते की तो/ती नेहमीच देशातील लोकांचे रक्षण करेल आणि हे त्याचे/तिचे पहिले कर्तव्य असेल. पण काही वेळा पोलीस अधिकारी त्यांना प्रदान केलेल्या कर्तव्याचा व अधिकारांचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात.
यासाठी सुप्रीम कोर्टाने PCA- पोलिस तक्रार प्राधिकरण स्थापन केले आहे. हे प्राधिकरण पोलिस अधिकार्यांविरुद्धच्या लोकांच्या तक्रारी पाहते. हे प्राधिकरण मुळात निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील एक पॅनेल आहे जे पोलिसांविरुद्धच्या गैरवर्तन किंवा निष्क्रियतेची प्रत्येक तक्रारींवरील सुनावणी करते.
महाराष्ट्राने २०१४ मध्ये पोलिस तक्रार प्राधिकरण (PCAs) ची स्थापना साली. पोलिस कर्मचार्यांविरुद्ध जनतेच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी ही एक स्वतंत्र संस्था स्थापण्यात अली आहेत. PCA मध्ये गंभीर गैरवर्तन, भ्रष्टाचार आणि अधिकाराचा गैरवापर अशा आरोपांच्या प्रकरणांशी कारवाई केली जाते. महाराष्ट्रात, राज्यस्तरावर एक PCA आणि नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती आणि कोकणात विभागीय स्तरावर सहा PCA आहेत. भारतातील प्रत्येक राज्यात एकापेक्षा जास्त PCA असतात.
पीसीए काय करू शकतात?
ते पोलिस कर्मचार्यांविरुद्धच्या तक्रारी प्राप्त करू शकतात. तसेच, पोलिसांना जबाबदार धरण्यासाठी इतर कारवाई देखील ते करू शकतात. राज्य आणि विभागीय पीसीए या दोघांना खालील अधिकार आहेत :
१ . तक्रारींची चौकशी करणे, सर्व संबंधित व्यक्तींचे म्हणणे ऐकणे, पुरावे प्राप्त करणे आणि पोलिस विभाग आणि राज्य सरकार यांच्याद्वारे अंमलबजावणी करण्याच्या शिफारशी देणे;
२ . पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी धमक्या किंवा छळाचा सामना करणार्या, साक्षीदार, पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारला सल्ला देणे;
३ . कोणत्याही पोलिस स्टेशनला, लॉक-अप किंवा इतर अटकेच्या ठिकाणी भेट देण्यासाठी PCA चे कोणतेही सदस्य, अध्यक्षांच्या लेखी अधिकाराने, या भेटी घेऊ शकतात.
PCA तुमची केस सोडवण्याचा प्रयत्न करते आणि ते पोलिसांपासून मुक्त आहे. तुमच्या तक्रारीवर विचार करण्याचे त्यांचे स्वतःचे अधिकार आहेत. पीडित किंवा पीडितेचा मित्र किंवा कुटुंबातील सदस्य यांच्याकडे तक्रार करू शकतात.
आपण त्यांच्याकडे कोणत्या तक्रारी करू शकता ?
राज्य आणि विभागीय पीसीएकडे खालील तक्रारी प्राप्त करण्याचा अधिकार आहे:
१ . पोलीस कोठडीत मृत्यू;
२ . गंभीर दुखापत (भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 320 अंतर्गत);
३ . बलात्कार किंवा बलात्कार करण्याचा प्रयत्न;
४ . विहित प्रक्रियेचे पालन न करता अटक किंवा ताब्यात घेणे;
५ . भ्रष्टाचार;
६ . खंडणी;
७ . जमीन किंवा घर बळकावणे
८ . कायद्याचे इतर कोणतेही गंभीर उल्लंघन किंवा कायदेशीर अधिकाराचा गैरवापर.
कोण तक्रार दाखल करू शकतो ?
PCA स्वतःहून पोलिसांविरुद्ध तक्रारी घेऊ शकते (सुओ मोटो). तसेच खालील लोकांनकडून तक्रारी घेऊ शकतात :
१ . पोलिसांच्या गैरवर्तणुकीचा/अत्याचाराचा बळी;
२ . पीडितेच्या कुटुंबातील सदस्य;
३ . पीडितेच्या वतीने कोणीही (या प्रकरणात, प्रतिज्ञापत्राने पीडितेची संमती दर्शविली पाहिजे ज्याने दुसर्या व्यक्तीला तक्रार दाखल करण्याची परवानगी दिली आहे);
४ . राष्ट्रीय मानवाधिकार आयोग;
५ . राज्य मानवी हक्क आयोग;
६ . पोलीस स्वतः.
PCA मध्ये तक्रार कशी करावी?
आवश्यक कागदपत्रे-
१ . पोलिसांमुळे दुखापत झाली असेल तर तक्रारीत वैद्यकीय अहवाल नमूद करा.
२ . आपण एक फोटो जोडू शकता जो पीडित व्यक्तीला दुखापत दर्शवेल.
३ . तुम्ही तुमची तक्रार नोंदवली असेल आणि पोलिसांकडून काही प्रतिसाद मिळाला असेल तर तुम्ही त्या तक्रारीची प्रत देखील जोडू शकता.
४ . पोलिसांच्या दैनंदिन डायरीतील नोंदीचा पुरावा.
प्रक्रिया -
तक्रार प्रक्रिया ऑफलाइन आहे त्यामुळे तुम्हाला लिखित स्वरूपातच तक्रार नोंदवावी लागेल.
पोलिसांविरुद्ध तक्रार करताना खालील गोष्टींचा उल्लेख करावा-
१ . तक्रारदाराचे नाव
२ . तक्रारीचा पत्ता
३ . तक्रारीचे संपर्क तपशील
४ . तक्रारीबद्दल लिहा- काय झाले, कधी झाले,
५ . ज्या अधिकाऱ्याच्या विरोधात तुम्हाला तक्रार करायची आहे त्याचे नाव,
६ . पोलिस अधिकाऱ्याने काय सांगितले किंवा केले याचे मुळात कारण,
७ . घटनास्थळी कोणी साक्षीदार असेल तर त्यांचे नाव देखील टाका.
अखेर, ही कागदपत्रे पीसीए कार्यालयात पाठवतात. शहरांनुसार पत्ता बदलतो याची देखील माहिती घ्या.
लक्षात घेण्यासारखे मुद्दे-
- तक्रार दाखल केल्यानंतर, तुम्हाला कोणताही प्रतिसाद मिळत नसेल (असे सहसा घडते) तर तुम्ही PCA ला त्याबद्दल विचारू शकता. (लिखित स्वरुपात केलेला अर्ज कधीही चांगला)
- तरीही प्रतिसाद न आल्यास आरटीआय कार्यालयात जा.
- तरीही काही झाले नाही तर पीसीए कार्यालयात जाऊन ते तुमच्या प्रकरणी काय कारवाई करत आहेत याची पुन्हा पडताळणी करा ,
- पीसीएच्या निर्णयावर तुम्ही समाधानी न झाल्यास संबंधित पोलिस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल करता येईल.
- एफआयआर घेतली नाही , तर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे जा.
- तिथेही तुमची निराशा झाली असेल तर सुनावणीच्या बाबतीत अनुक्रमे मॅजिस्ट्रेट आणि उच्च न्यायालयात जा.
- अशा प्रकारे तुम्हाला पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल करता येईल.
तक्रार कुठे दाखल करायची?
१) महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण-
पत्ता- चौथा मजला, कोपरेज टेलिफोन एक्सचेंज, महर्षी कर्वे रोड, नरिमन पॉइंट, मुंबई-४००२१
ईमेल-mahaspca@gmail.com
२) विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, पुणे
विभागाचा पत्ता- १ मजला, अनंत हाइट्स, जाधव नगर, नांदेड शहराच्या पुढे, S. No- २९ /२१९ सिंहगड रोड, पुणे-४११०६८
3) विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, कोकण विभाग
पत्ता- सेक्टर १७ , पाली रोड, कळंबोली पोलीस मुख्यालय, नवी मुंबई- ४१०२१८
Comments
Post a Comment